तुम्ही चिंता करता का ? संकटांना सामोरे जा ,आनंदी जीवन जगा Do you worry ? Face adversity, Live A Happy Life
Live A Happy Life
Friends, life is beautiful and there are ups and downs in life. If we live thinking of these ups and downs or pleasures and pains, we will not be able to enjoy this life, that is, being born as a human being.
This is not to say that we should not think about it, but that we should deal with it, because the more we worry, the more we get stressed, the more we get anxious, the more we get anxious. Irritability increases, irritability increases, does not communicate well with people close to you, does not tell them things in your life, does not lighten the mood The same cannot be said of anger or tension. Everyone in life has problems, problems, the difference is that some face and some blame, that this only happens to me, if not, just face, all the problems are removed. Believe in yourself that I can do everything well, I will eliminate all difficulties. Just look at how beautiful and happy life is. No work in life is complete without obstacles or difficulties. Make yourself so in life that those who live with you should feel proud, proud and those who are not with you should feel inferior. There is a rule in life that if there is a problem then two opportunities come along with it. Don't give up so much,
and yet another tension, anxiety, stress, whatever you say, it can cause mental imbalance and many people get sick. So friends, from today onwards, forget about anxiety, stress, tension, difficulties and live a happy life and help others to overcome their worries.
Always keep smiling Laughter is
the panacea that keeps anger, anxiety away from you, be happy, no matter how much it hurts, don't tell anyone because the solution, and you have to deal with it. And we want to see in front of us that a lot of happiness-suffering, difficulties, laughter-crying also depends on the past, so never look back in life, forget the things of the past and start a new endeavor, don't get frustrated, don't get frustrated, you will definitely get what you want.
And life will be happy.
Thank you
Marathi Translation -आनंदी जीवन जगा
मित्रांनो जीवन हे खूप सुंदर आहे आणि जीवनामध्ये चढ उतार येत असतो. जर आपण ह्या चढ - उतार किंवा सुख - दुख याचा विचार करत जर जगलो तर आपल्याला ह्या जीवनाचा म्हणजेच ह्या माणूस म्हणून जन्माला आल्याचा आनंद घेता येणार नाही.
असं म्हणत नाही कि आपण याचा विचार नाही करायला पाहिजे पण आपण याला सामोरे गेलो पाहिजे , कारण आपण जितकी जास्त चिंता करणार , जितका आपण ताण घेणार तितका तो वाढत जातो , चिंता वाढत जाते , मग काय कशामध्येच मन लागत नाही . संताप येतो , चिडचिडेपणा वाढतो , जवळील लोकांसोबत व्यवस्तीत बोलत नाही, आपल्या जीवनातील गोष्टी त्यांना सांगत नाही , मन हलके करत नाही , मित्रांनो जीवनामध्ये कितीपण कशापण अडचणी असूद्यात त्यांना सामोरे जा शांतपणे , संयम ठेवल्याने , शांत राहिल्याने विचार चांगला करू शकतो , त्याच्याबद्दल उपाय सुचायला मदत मिळते , तेच जर रागामध्ये किंवा टेन्शन मध्ये उपाय सुचू शकणार नाही. जीवनामध्ये प्रत्येकाला अडचणी , समस्या आहेत फरक इतकाच कि काही सामोरे जातात तर काही दोष देतात , कि हे फक्त माझ्यासोबतच होतंय तर नाही , फक्त सामोरे जा सगळ्या अडचणी दूर होतात . स्वतः वर विश्वास ठेवा कि मी सगळं चांगल करू शकतो , मी सगळ्या अडचणींना नष्ट करेल . बस्स इतकच करायचं बघा जीवन किती सुंदर आणि आनंदाने जातंय . जीवनामध्ये कोणतेच काम अडथळ्याशिवाय किंवा अडचणी आल्याशिवाय पूर्ण होत नाही जे शेवट पर्यंत प्रयत्न करतात ना तेच यशस्वी होतात किंवा आनंदात जगतात . जीवनामध्ये स्वतः ला असे बनवा कि ज्याचा सोबत राहतो त्याला अभिमान , गर्व वाटलं पाहिजे आणि ज्यांच्यासोबत नाही त्यांना कमतरता भासली पाहिजे . जीवनामध्ये नियम आहे कि एक अडचण आली तर दोन संधी त्याचसोबत फ्री येते फक्त त्या ओळखता आल्या पाहिजे , त्याचा फायदा करून घेता आला पाहिजे . झालं एवढच हार मानू नका ,
आणि अजून एक टेन्शन , चिंता, स्ट्रेस , जे म्हणाल ते याच्यामुळे माहिती आहे का मानसिक संतूलन सुद्धा बिघडू शकते आणि बऱ्याच जणांना आजार सुद्धा जडतात . तर मित्रांनो आज पासून चिंता , स्ट्रेस, टेन्शन , अडचणी याला विसरून सामोरे जाऊन जीवन आनंदामध्ये जगा आणि दुसऱ्यांना पण मदत करा त्यांची चिंता दूर करण्यामध्ये .
नेहमी हसत राहा
हसणे हे असं रामबाण औषध आहे कि ते रागाला, चिंतेला आपल्यापासून दूर ठेवते, खुश राहा , कितीही त्रास असला तरी कुणाला सांगू नका कारण त्याचा उपाय , आणि त्याला सामोरे पण तुम्हालाच जावे लागते,लागेल. आणि आपण समोर बघायचं कि मागे याच्यावर सुद्धा बरंच सुख -दुख , अडचणी, हसणं - रडणं अवलंबून असतंय , तर जीवनामध्ये कधी माघे वळून बघू नका, भूतकाळातील गोष्टी विसरून जा आणि नवीन प्रयत्न सुरु करा निराश , हताश होऊ नका , नक्कीच जे पाहिजे ते पण मिळेल आणि जीवन आनंदमय होईल .
धन्यवाद
Comments
Post a Comment