Tips for Healthy , Disease Free Life / निरोगी , रोगमुक्त चांगल्या आयुष्यासाठी काही चांगल्या टिप्स

 Some great tips for a healthy, disease-free life


As modern medical technology improves in today's world, unhealthy lifestyles are increasing the number of physical and mental problems. It is better to live life in a way that you will never get sick than to get modern medical solutions to every problem. So what to do, friends, the same tips we are following 1) Getting up early in the morning 2) Exercising and meditating 3) Eating nutritious food 4) Eating on time 5) Getting a good night's sleep


 Here are some tips on how to live a long and healthy life. This lifestyle helps you to avoid getting sick, at the same time it helps you to lose weight and maintain it.


1). Getting up early in the morning


There is an old saying that "going to bed early, getting up early makes a person healthy, rich and wise." I don't know if it will make you rich or not but it can make many people rich, but it will definitely make you healthy. And waking up early doesn't mean waking up late at night and getting up early, but not enough sleep is important to the body, but not too much and not too little.


2). Exercise and meditation


Earlier people had to use their body even for their simple work and still have to. But not many people. Nowadays, he will get up comfortably, then he will go to work in the car, sit there, get back in the car to go home, and after coming home, he will sit again for the rest of the day. In such a life, tell me why the body is suffering or not. This physical inactivity is becoming the main cause of many ailments. If you do not need to do physical work for your simple work, then walking, running, playing and many other things that can make your body suffer should be added in your life. Now meditation - the body is connected to the mind. There are so many types it's hard to say. Stress and anxiety have a devastating effect on your physical health. So meditation is a very important mental exercise, which, among other things, helps you to keep yourself away from anxiety, stress in life. This is a simple solution and do it regularly.


3) Nutritious diet


   Friends, junk food is very popular right now, it is made in a short time, and it is becoming a habit to eat outside food. But friends, the food you eat is causing a lot of diseases like weight gain, blood pressure. So nutrition in the diet means that the body should get the nutrients that it needs. Green vegetables, fruits should be included more and more. Eat a diet that provides all the nutrients to the body.


 3. Eating on time


It is also very important to eat on time when you are hungry. Sometimes we go against the body, even if we are not hungry, out of habit, or if we eat unhealthily at the behest of someone, then the food is not digested properly. Then the acidity and indigestion begin and this increases the chances of other diseases taking root. Being hungry is a sign of good health, but if you are not hungry then stop and eat. And if you are not hungry then consult a good doctor.


4) Get a good night's sleep


 It may seem light to you but most people stay up late even when it's time to go to bed. Yoga and Ayurveda, Ayurvedic doctors also say that sleeping at night and being active during the day is good for the body. But many take coffee and stimulants to work or study late into the night. Then there is the habit of staying active at night and sleeping during the day. We can do this, but it still affects our health. And if a lot of people go to work and they have to work at night, there is no alternative but to try to avoid it. But try to get a good night's sleep as much as possible. Health counselors, doctors say that this kind of unnatural life is one of the causes of cancer and other diseases.

If you use these tips, you can definitely live a healthy, happy life.

Marathi Translation -


 निरोगी , रोगमुक्त चांगल्या आयुष्यासाठी काही चांगल्या टिप्स


आजच्या युगात आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान जेवढे चांगले होत आहे, तेवढेच आरोग्यहीन जीवनशैलीमुळे शारीरिक , मानसिक समस्या वाढत आहेत ,  प्रत्येक समस्येवर आधुनिक वैद्यकिय उपाय मिळवण्यापेक्षा , तुम्ही कधीच आजारी पडणार नाही अशा पद्धतीने जीवन जगणे अधिक चांगले आहे. तर मग करायचं काय तर मित्रांनो त्याच टिप्स आपण बगतोय  त्याच्यामध्ये  १ ) सकाळी लवकर उठणे २) व्यायाम व ध्यान करणे ३) पौष्टिक आहार घेणे  ४) वेळेवर जेवण करणे  ५ ) चांगली झोप घेणे 


 दीर्घ आणि चागला निरोगी आयुष्य कसे जगता येईल यासाठी येथे ह्या टिप्स आहेत. ह्या जीवनशैलीमुळे तुम्हाला आजार न होण्यास म्हणजे टाळण्यास  मदत करते, त्याच सोबत तुमचे वजन कमी आणि मैण्टिन होण्यासही मदत होते.


१) . सकाळी लवकर उठणे 


एक  जुनी म्हण आहे कि  "लवकर झोपूया , लवकर उठूया हे  माणसाला निरोगी, श्रीमंत आणि ज्ञानी बनवते." मला माहित नाही की ते तुम्हाला श्रीमंत बनवेल कि नाही पण बऱ्याच जणांना श्रीमंत पण बनवू शकते , पण  ते तुम्हाला नक्कीच निरोगी बनवेल. आणि लवकर उठणे म्हणजे असं नाही कि रात्री उशिरापर्यंत जागायच आणि परत लवकर उठायचं तर नाही शरीराला पुरेशी झोप पण महत्वाची आहे , जास्त पण नाही आणि कमी पण नाही . 


२) . व्यायाम व ध्यान 


अगोदर  लोकांना त्यांच्या साध्या कामासाठी सुद्धा  त्यांच्या  शरीराचा वापर करावा लागत होता आणि अजून पण करावा लागतोय . पण बऱ्याच जणांना तस नाहीये . आजकाल कस हे माहिती का आरामात उठणार मग गाडीमध्ये कामाला जाणार , तिथे बसेल,  घरी जाण्यासाठी गाडीमध्ये परत बसणार आणि घरी आल्यानंतर पण  पुन्हा उरलेल्या दिवसभरात बसणार . अशा जीवनामध्ये मला सांगा शरीराला कष्ट , श्रम होतोय का नाही ना. ही शारीरिक निष्क्रियता बऱ्याच आजाराचं  रोगांचे मुख्य कारण बनत आहे.आपल्या साद्या  कामासाठी आपल्याला शारीरिक श्रम करण्याची गरज नसल्यास आपल्या जीवनामध्ये  चालणे , धावणे, खेळणे आणि अजून इतर गोष्टी जे तुमचा शरीराला कष्ट देऊ शकेल ते जोडल्या पाहिजेत . आता ध्यान -  शरीर  मनाशी जोडलेले आहे. आजकाल बरेच असे  आजार आहेत जे मनोवैज्ञानिक आहेत. तणाव आणि चिंता आपल्या शारीरिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम करतात. म्हणून ध्यान हा एक खूप महत्वाचा मानसिक व्यायाम आहे , जो इतर गोष्टींबरोबरच तुम्हाला जीवनातील चिंता , ताण -तणाव पासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी मदत करते. हा एक साधा  उपाय आहे आणि ते नियमितपणे करा.


३ ) पौष्टिक आहार 


   मित्रांनो , सध्या जंक फूड खूप प्रचलित आहे , कमी वेळेमध्ये बनते , आणि हि एक प्रथा बनतेय कि बाहेरील पदार्थ खाणे . पण मित्रांनो हे जे फूड खाताय त्याच्यामुळे बरेच आजार होत आहेत , वजन वाढणे , ब्लड प्रेशर  अशे बरेच आजार आहेत . तर  आहारामध्ये पौष्टिक म्हणजे जे शरीराला पोषक तत्व पाहिजे ते मिळेल असा आहार घ्यायाला पाहिजे . ग्रीन वेजिटेबल्स , फ्रुटस याचा समावेश कजास्तित जास्त केला पाहिजे . सगळे पोषक तत्व शरीराला भेटणार असा आहार घ्यावा . 


 3. वेळेवर जेवण करणे 


हे पण खूप महत्वाचं आहे कि वेळेवर जेवायला पाहिजे आपल्याला जेव्हा भूक लागली ना तेव्हा खायला पाहिजे . कधी कधी तर बऱ्याचद आपण शरीराच्या विरोधात जातो भूक नसतानाही  सवयीबाहेर किंवा  मग कुणाच्या  सांगण्यावरून जर आपण अवेळी  खाल्ले तर  अन्न व्यवस्तीत  पचत  नाही. मग आंबटपणा आणि अपचन सुरू होते आणि यामुळे इतर रोग  मूळ धरण्याची शक्यता वाढते. भूक लागणे हे तर चांगल्या आरोग्याचं  लक्षण आहे, पण भूक नसेलच ना  तर थोडे थांबून मग खावे. आणि जर भूक लागत नसेल तर मग चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा . 


४ ) चांगली झोप घेणे 


 हे आपल्याला हलके वाटत असेल पण बरेच लोक झोपण्याची वेळ झाली असतानाही उशिरापर्यंत जागी  राहतात. योग आणि आयुर्वेद , आयुर्वेदिक डॉक्टरही सांगतात  की रात्री झोपणे आणि दिवसा सक्रिय असणे शरीराला  चांगले आहे. पण बरेचजण  रात्री उशिरापर्यंत काम किंवा अभ्यास  करण्यासाठी कॉफी आणि उत्तेजक द्रव्ये घेतात . मग  रात्री सक्रिय राहण्याची आणि दिवसा झोपण्याची सवय लागते. आपण हे करू शकतो , तरीही त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. आणि बरेच जण कामाला जातात तर त्यांना रात्री पण काम करावं लागत तर तिथं पर्याय नसेल पण तरी पण टाळण्याचा प्रयत्न करावा .  पण शक्य होईल तेवढे रात्री चांगली झोप घेण्याचं प्रयत्न करावा . आरोग्य  सल्लागार , डॉक्टर  सांगतात की अशा प्रकारचे अनैसर्गिक जीवन कर्करोग आणि इतर रोगांना  कारणीभूत किंवा त्या घटकांपैकी एक आहे . 


ह्या टीप्स चा जर आपण वापर केला तर नक्कीच  निरोगी जीवन , आनंदी जीवन  जगू शकतो . 

Comments